तलाठी पदभरती माहिती
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
| अ. क्र. | संवर्ग | विभाग | वेतन श्रेणी |
|---|---|---|---|
| १ | तलाठी | महसूल व वन विभाग | S-८: २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते |
१. शैक्षणिक अर्हता-
१.१ जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पूढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मुंबई यांच्या दिनांक १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
-
शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र. मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९, दिनांक ४/२/२०१३ नुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- जर परीक्षा उत्तीर्ण नसेल, तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण २०००/प्र.क्र६१/२००९/२९, दिनांक १९/३/२००३ नुसार नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षांच्या आत संगणकाची अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांनी मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
१.२ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता
पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
२. पात्रता
- भारतीय नागरिकत्व
-
वयोमर्यादा:
- वयोमर्यादा गणण्याची दिनांक जाहिरातीत नमूद केलेली असेल
- विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा
| अ.क्र | प्रवर्ग | आवश्यक वयोमर्यादा |
|---|---|---|
| १ | खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही-२०१५/प्र.क्र४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. |
| २ | मागासवर्गीय उमदेवारांसाठी | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. एसआरकी-२०१५/प्र.क्र४०४/कार्या.१२, दि.२५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे. तथापि उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमीलेअर (Creamy Layer) मोडणाऱ्या वि.जा-अ, भ.ज.व, भ.ज.क, भ.ज. ड, विमा.प्र., इ.मा.व., एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यू.एस (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. |
| ३ | पदवीधारक उमेदवारांसाठी अंशकालीन | शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. अशंका-१९१८/प्र.क्र५०७/१६-अ दि.२ जानेवारी २०१९ मधील तरतूदीनुसार, कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे राहील. |
| ४ | स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. नियक-१०१०/प्र.क्र. ०८/२०१०/१६-अदि.६/१०/२०१० नुसार कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. |
| ५ | खेळाडू उमेदवारांसाठी | शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. राक्रीधो २००२/प्र.क्र./६८/क्रीयुसे-२ दि.१/७/२०१६ नुसार, खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहीत वयोमर्यादेत ५ वर्षापर्यंत शिथिलता दिली जाईल. तथापि, उच्चतम वयोमर्यादा ४३ वर्षे राहील. |
| ६ | दिव्यांग उमेदवारांसाठी | महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. एसआरव्ही-१०९८/प्र.क्र.३९/९८/१६-अ, दि.१६/६/२००१ नुसार उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यंगत्वाचे प्रमाण ४०% असणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर नियुक्तीपूर्वी संबंधित तज्ञ वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक. |
| ७ | प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी | महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रकल्प-१००६/मु.स.३९६/प्र.क्र५६/०६/१६-अ, दि.३/२/२००७ नुसार, कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे राहील. मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांनाही सवलत लागू. |
| ८ | माजी सैनिक उमेदवारांसाठी | महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. मासैक-१०१०/प्र.क्र२७९/१०/१६-अ दि.२०/८/२०१० नुसार, माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेत सेवा कालावधी अधिक ३ वर्षे सुट. दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षेपर्यंत राहील. |
- तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव २०२३/प्र.क्र/१४/कार्या १२ दि.३ मार्च २०२३ अन्वये दि. ३१ डिसेंबर २०२३ पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.
-
परीक्षेचे स्वरुप व त्या अनुषंगिक सूचना-
अ.क्र पदाचे नाव मराठी
प्रश्नमराठी
गुणइंग्रजी
प्रश्नइंग्रजी
गुणसामान्य ज्ञान
प्रश्नसामान्य ज्ञान
गुणबौध्दिक चाचणी / अंकगणित
प्रश्नबौध्दिक चाचणी / अंकगणित
गुणएकूण प्रश्न एकूण गुण १ तलाठी २५ ५० २५ ५० २५ ५० २५ ५० २०० २०० - परिक्षा कालावधी : - २ तास (१२० मिनिटे)
- परीक्षेचे स्वरुप
- १) परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
- २) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क. प्रानिर्मर २२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
- ३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. प्रनिमं-२००९/प्र.क्र.३५६/ई-१०, दि.०१/०१/२०१० मधील तरतुदीनुसार व शासन निर्णय, सामान्य प्रशासन शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.
- ४) उमेदवारांची निवडसूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र.एस.आरव्ही-१०९७/प्र.क्र.३१/९८/१६अ. दि.१६/३/१९९९ आणि शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. संकीर्ण१११९/प्र.क्र३९/१६-अ, दि.१९/१२/२०१८ तसेच शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का. १३-अ दि.४ मे २०२२ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- ५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
- ६) परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्य क्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. प्रानिमं१२२२/प्र.क्र५४/का.१३-अ दि.४ मे २०२२ मध्ये नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
३. विहित कागदपत्रे / प्रमाणपत्रे संलग्न (Upload) करणे:-
(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉर्मेट मध्ये संलग्न (Upload) करावीत.
(दोन) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे.
| अ.क्र | प्रमाणपत्र / कागदपत्र | अ.क्र | प्रमाणपत्र / कागदपत्र |
|---|---|---|---|
| १ | अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता) | १० | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा |
| २ | वयाचा पुरावा | ११ | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा |
| ३ | शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा | १२ | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा |
| ४ | सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा | १३ | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा |
| ५ | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा | १४ | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा |
| ६ | अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र | १५ | अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र |
| ७ | पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा | १६ | मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा |
| ८ | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा | १७ | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र |
| ९ | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा | १८ | अनुभव प्रमाणपत्र |
(तीन) उपरोक्त प्रमाणपत्र / कागदपत्रे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
(चार) खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्विकृत केला जाणार नाही.
४. सर्वसाधारण सूचना
- एक) अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- दोन) उमेदवारास फक्त एकाच जिल्हयासाठीच अर्ज सादर करता येईल. वेगवेगळ्या जिल्हयात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तथापि, एखादया उमेदवाराने एकाच जिल्हयात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.
- तीन) अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ: https://mahabhumi.gov.in
- चार) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- पाच) अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- सहा) अर्ज भरण्याची व परिक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
४.१ जिल्हा केंद्र निवड
- ४.१.१ प्रस्तुत परीक्षेकरीता विविध जिल्हा (परीक्षा) केंद्राचा तपशील https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील सदर परीक्षेच्या परीक्षा योजना / पध्दती या सदरामध्ये उपलब्ध आहे.
- ४.१.२ अर्ज सादर करताना जिल्हा (परीक्षा) केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- ४.१.३ जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- ४.१.४ जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरुपी रहिवास पत्त्याचे आधारे संबंधित महसूली मुख्यालयाच्या जिल्हाकेंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेशपत्र देण्यात येईल. याबाबत शासनाचे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम राहील.
४.२ परीक्षा शुल्काचा भरणा
४.२.१ परीक्षा शुल्क (फी)
| अ.क्र | पदाचे नाव | आवश्यक परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) |
|---|---|---|---|---|
| १ | तलाठी - पेसा क्षेत्राबाहेरील | १०००/- | ९००/- | ९००/- |
| २ | तलाठी - पेसा क्षेत्रातील | - | ९००/- | ९००/- |
माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
४.२.२ परीक्षा शुल्क ना परतावा (Non- refundable) आहे.
४.२.३ अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या Submit बटनावर क्लिक केल्यानंतर Pay Fees या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुखपृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील Fees Not Paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात / पद / परीक्षेसमोरील Pay Now या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.
४.२.४ परीक्षा शुल्काचा भरणा खालील पद्धतीने करता येईल.
ऑनलाईन पध्दतीने :
- परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे अदा करता येईल.
- परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून रक्कम वजा झाल्यानंतर, "Payment Successful" संदेश ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय परीक्षा शुल्क पावती तयार होणार नाही. उमेदवाराने संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून किंवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.
- परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये भरणा यशस्वी झाला आहे की नाही, याची स्थिती (Status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याची खात्री करणे आणि बँकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याची पडताळणी करणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहीत दिनांक / विहित वेळेपूर्वी करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. विहीत मुदतीत शुल्क भरणे न झाल्यास उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
५. दिव्यांग उमेदवार: - लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत
- लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेकरिता लेखनिक व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक दिव्यांग २०१९/प्र.क्र.२००/दि. कर, दिनांक ५ ऑक्टोबर २०२९ अन्वये जारी मार्गदर्शिका २०२१ व तद्नंतरच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.
- प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरे लिहिण्यास सक्षम नसलेल्या पात्र दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक मदत किंवा अनुगृहीत कालावधीसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून ७ दिवसांत आवश्यक प्रमाणपत्र/कागदपत्रांसह विहित नमुन्यात लेखी विनंती करून पूर्व परवानगी घ्यावी.
- लेखनिकाची व्यवस्था उमेदवार स्वतः करेल की कार्यालयाद्वारे करावी, याचा उल्लेख ऑनलाईन अर्जामध्ये स्पष्ट असावा; फक्त अशा अर्जांवरच विहित नमुन्यातील लेखी विनंतीचा विचार केला जाईल.
- अर्जामध्ये मागणी न करता किंवा शासनाची विहित पद्धतीने पूर्व परवानगी न घेतल्यास परीक्षेवेळी लेखनिक मदत किंवा अनुग्रह कालावधी उपलब्ध होणार नाही.
- परीक्षेसाठी लेखनिक मदत व/किंवा अनुग्रह कालावधीस परवानगी मिळालेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल, तसेच संबंधित उमेदवारांना नोंदणीकृत ई-मेलवर कळविण्यात येईल.
- प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी उमेदवारांनी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द दिव्यांग उमेदवारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलोकन करणे आवश्यक आहे, जे त्यांच्या हिताचे राहील.
६.निवडसूचीची कालमर्यादा :
- निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी वैध राहील किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेतली गेली आहेत, त्या दिनांकापर्यंत वैध राहील. यानंतर ही निवडसूची व्याप्त होईल. भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेले भरती, निवडसूची, प्रतिज्ञासूची इत्यादी संबंधी निर्देश, सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील.
- निवड समितीने तयार केलेल्या निवडसूचीमधून वरिष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर, शिफारस केलेला उमेदवार विहित मुदतीत रुजू न झाल्यास, संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार, जात प्रमाणपत्र / अन्य आवश्यक प्रमाणपत्रांची अनुपलब्धता/अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळल्यास, अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर राजीनामा दिल्यास किंवा मृत्यू झाल्यास, अशी पदे त्या-त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील.
- भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेले निर्देश, सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील.
७. सेवाप्रवेशोत्तर शर्ती
- नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील अहर्ता / परीक्षा विहीत वेळेत व विहीत संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक राहील: विभागीय / व्यावसायिक परीक्षा.
- जेथे प्रचलित नियमानुसार विभागीय परीक्षा विहीत केली असेल अथवा आवश्यक असेल, तेथे त्यासंबंधी केलेल्या नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार, जर ती व्यक्ती आगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा तिला उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसेल, तर ती परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळीबाबतचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
८. प्रवेश प्रमाणपत्र :-
- परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे १० दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्यावेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमूद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा कार्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक आठवडा आगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
- परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेशप्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदत कक्षाकडे संपर्क साधावा.
- परीक्षेच्यावेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
- आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधारवर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhar Generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
- नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रिया यांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
९. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी
- पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी / वाढ) होण्याची शक्यता आहे.
- पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल (कमी / वाढ) होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पदसंख्या / अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त पदे परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल. यास्तव परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्यावर विचारात घेतली जाणार नाही.
- महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चूकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, तसेच महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र. महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२ दि.४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर निवडीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. तसेच, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना त्या-त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
- एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र (Caste Certificate) उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असल्यासच संबंधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
- समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ दि.१३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ. दि.१९ डिसेंबर २०१८ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरीता शासन निर्णय, सामान्य प्रशासन, विभाग क्र. राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दि.१२ फेब्रुवारी, २०१९ व दि.३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१२/प्र.क्र. १८/विजाभज-१, दि.२५ मार्च, २०१३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार तसेच शासन शुध्दीपत्रक संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल.
- शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१३/प्र.क्र. १८२/विजाभज-१, दि.१७ ऑगस्ट, २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट यामध्ये मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
- सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीसाठी विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा तपशील कालावधी विचारात घेतला जाईल.
- अराखीव (खुला) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीसाठी विचार केला जाईल. सर्व माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
- कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसामान्य रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसामान्य रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
- कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी-सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
- सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
९.१६ खेळाडू आरक्षण :
- शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै, २०१६ तसेच शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र.क्र६८/क्रीयुसे-२ दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शुध्दीपत्रक दि.१० ऑक्टोंबर २०१७, शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः संकीर्ण-१७१६/प्र.क्र१८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून, २०२२ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
- प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
- खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतो, या विषयाच्या पडताळीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
- एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
- परीक्षेकरीता अर्ज सादर करतांना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र ठरतो, याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारस / नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.
९.१७ दिव्यांग आरक्षणः
- दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६-अ दिनांक २९ मे, २०१९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
- महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.७९/ई-१अ दि.२९ जून २०२१ अन्वये तलाठी सवंर्गाकरिता दिव्यांगांची पदे सुनिश्चित करण्यात आलेली आहे. सदरचा तपशील सोबतच्या परिशिष्ट-२ प्रमाणे आहे.
- दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.
- दिव्यांग व्यक्तींची संबंधित संवर्ग / पदाकरीता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील.
- दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे, याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
- संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान ४०% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार / व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी/सवलतीसाठी पात्र असतील.
-
लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार / व्यक्ती खालील सवलतींच्या दाव्यास पात्र असतील:
- दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी-सवलती.
- दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सोयी-सवलती.
- दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-२०१८ प्र.क्र.४६/आरोग्य-६ दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in अथवा SADM संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
९.१८ अनाथ आरक्षण
- अनाथ व्यक्तींचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक अनाथ-२०२२/प्र.क्र/१२२/का-०३ दि.६ एप्रिल २०२३, व समक्रमांकाचे शासन पूरक पत्र दि.१० मे २०२३, तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
- महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाकडील, शासन निर्णय क्रमांक अनाथ-२०१८/प्र.क्र. १८२/का-०३ दिनांक दि. ६ सप्टेंबर २०२२ तसेच दि.६ एप्रिल २०२३, अन्वये अनाथ प्रवर्गासाठी दावा दाखल करणाऱ्या उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी महिला व बाल विकास विभागाकडील सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्य यंत्रणेकडून वितरीत करण्यात आलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल. नियुक्ती पश्चात ६ महिन्यांच्या कालावधीत आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांचेकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी / विभाग प्रमुख यांची राहील.
- अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे, त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
९.१९ माजी सैनिक आरक्षण
- गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नावनोंदणी केली असल्यास मूळ प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या माजी सैनिक उमेदवारांच्या कागदपत्रांची सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी झाल्याशिवाय त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार नाहीत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. आरटीए-१०८२/३५०२/सीआर-१००/१६-अ दि. २ सप्टेंबर १९८३ नुसार:
- माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदांवर भरती करताना युध्द काळात किंवा युध्द नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आले असल्यास, असा माजी सैनिक १५% राखीव पदांपैकी उपलब्ध पदांवर प्राधान्य क्रमाने नियुक्ती देण्यास पात्र राहील.
- युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तिला त्या नंतरच्या पसंती क्रमाने १५% आरक्षित पदापैकी उपलब्ध पदावर नियुक्तीस पात्र राहील. तथापि, सदर उमेदवाराने तलाठी पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
९.२० प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एईएम-१०८०/३५/१६-अ दिनांक २० जानेवारी १९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी नमूद करण्यात येणाऱ्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील. गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील प्रकल्पग्रस्त असलेबाबतचे शासकीय नोकरी मिळण्यासाठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवाराचे मुळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
९.२१ भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण
गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या भूकंपग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचेकडील भूकंपग्रस्त असलेबाबतचे शासकीय नोकरी मिळण्यासाठी विहित केलेले मुळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. लेखी परीक्षेत निवड झालेल्या भूकंपग्रस्त उमेदवाराचे मुळ प्रमाणपत्र हे संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकारी यांचे कार्यालयाकडून पडताळणी करुन घेतले जाईल. सदर पडताळणी अंती प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारे सदर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश देणेबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
९.२२ पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरीता आरक्षण :-
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.पअंक-१००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दि.२७.१०.२००९ व क्र. अशंका-१९१३/प्र.क्र.५७/२०१३/१६-अ, दि. १९/९/२०१३ नुसार शासकीय कार्यालयामध्ये ३ वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या उमेदवाराने सदरच्या अनुभवाची रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद केलेली असणे आवश्यक राहील. निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांची त्यांच्या अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील मुळ प्रमाणपत्र व तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
१०. तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
- पेसा (PESA) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय.
- शासन अधिसूचना क्र. आरबी/टीसी/ई-१३०१३ (४) नोटिफिकेशन-१४७४/२०१४ दि.९/६/२०१४ नुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.
- स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ "जे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी आजोबा हे दि.२६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रात सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमेदवार" असा होय.
- अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दि.२६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत. असे उमेदवार तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदासाठी अर्ज करू शकतील.
- अनुसूचित क्षेत्रातील उमेदवाराकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.
- अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ट-१ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात आलेली आहे.
११. पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी)-
- तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शासन निर्णय क्र.रिषभ/प्र.क्र/६६/२०११/ई-१०दि.१७ जून २०११ नुसार ज्या परीक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. जर जन्म दाखल उपलब्ध नसेल, तर शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा, ज्यात महाराष्ट्रात जन्म झाल्याची नोंद असावी. १५ वर्षे सलग रहिवास असलेल्या उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
- आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन निर्णय व न्यायालयीन आदेशांच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश जारी होईल; ६ महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा नियुक्ती रद्द होईल.
- उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल; परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील; महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन व सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू होणार नाही. भविष्यात बदल झाल्यास नियमानुसार लागू होईल.
- भरती प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्रितरित्या असली तरी, तलाठी संवर्गासाठी प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार केली जाईल; उमेदवाराचे गुण फक्त अर्ज केलेल्या जिल्हयामध्ये विचारात घेतले जातील.
- निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा हेच कार्यक्षेत्र असेल; पात्रता पूर्ण झाल्यावर कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय व चारित्र पडताळणी करून नियुक्तीपत्र दिले जाईल. सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना असतील.
- अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत मुळ प्रमाणपत्राच्या आधारे तपासली जाईल; खोटी किंवा चुकीची प्रमाणपत्रे आढळल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल.
१२. परीक्षेस प्रवेश
- संबंधित परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्रावर नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेच्या उपस्थितीसाठी पात्र समजले जाईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी, नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपुर्वी १ तास अगोदर ओळख तपासणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- कुठल्याही परिस्थितीत परीक्षा सुरु झाल्यानंतर उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. अशा उमेदवारांना पुनर्परीक्षा देण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम इत्यादींबाबत सविस्तर तपशीलासाठी शासनाचे https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांसाठी माहिती विभागातील सूचना अंतर्गत 'सर्वसाधारण सूचना' तसेच 'परीक्षा' या सदराखालील महसूल विभाग (गट क) संवर्ग तलाठी परीक्षा मध्ये उपलब्ध माहितीचे अवलोकन करावे.
- शासनाचे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती / जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
- सदर जाहिरात शासनाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परिशिष्ट- २
तलाठी पदभरती-२०२३
तलाठी पदाकरिता सुनिश्चिती दिव्यांगत्व
| अ.क्र | संवर्ग | विभाग | शासन निर्णय / आदेश | शारिरीक पात्रता / दिव्यांग प्रवर्ग |
|---|---|---|---|---|
| १ | तलाठी (गट-क) | विभाग महसूल व वन विभाग | शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.७९/ई-१अ दि.२९ जून २०२१ |
S, ST, W, BN, L, KC, PP, MF, SE, H, C, a) LV b) HH c) OA, OL, LC, DW, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above |
Abbreviations:-
| Sr. No | Abbreviations | Long Form | Sr. No | Abbreviations | Long Form |
|---|---|---|---|---|---|
| 1 | B | Blind - अंध | 9 | DW | Dwarfism - शारिरीक वाढ खुंटणे |
| 2 | LV | Low vision - अल्पदृष्टी | 10 | AAV | Acid Attack Victim - आम्ल हल्लाग्रस्त |
| 3 | D | Deaf - कर्णबधीर | 11 | ASD | Autism Spectrum Disorder (M - Mild) - स्वमग्नता |
| 4 | HH | Hearing Handicapped - ऐकू येण्याची दुर्बलता | 12 | ID | Intellectual Disability - मंदबुध्दी किंवा आकलन क्षमतेची कमतरता |
| 5 | OL | One Leg - एक पाय | 13 | SLD | Special Learning Disability - विशिष्ठ शिक्षण अक्षमता |
| 6 | OAL | One Arm and One Leg - एक हाथ आणि एक पाय | 14 | MI | Mental Illness - मानसिक आजार |
| 7 | CP | Cerebral Palsy - अस्थीव्यंग्ता / मेंदूचा पक्षघात | 15 | MD | Multiple Disability - बहुविकलांग |
| 8 | LC | Leprosy Cured - कुष्ठरोग | 16 | M MoD | Mild Moderate |
Abbreviations:-
| Sr. No | Abbreviations | Long Form | Sr. No | Abbreviations | Long Form |
|---|---|---|---|---|---|
| 1 | S | Sitting | 7 | PP | Pulling & Pushing |
| 2 | ST | Standing | 8 | MF | Manipulation with Fingers |
| 3 | W | Walking | 9 | SE | Seeing |
| 4 | BN | Bending | 10 | H | Hearing |
| 5 | L | Lifting | 11 | C | Communication |
| 6 | KC | Kneeling | 12 | RW | Reading & Writing |
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments