Maharashtra Police Bharti Exam
- Home
- Course Details
सशस्त्र पोलीस शिपाई
6.1) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखाली राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (गट-क) पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत.
6.2) सेवा प्रवेश नियम -
(i) महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी खालील सेवाप्रवेश नियम लागू राहतील.
(ii) राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) (सेवा प्रवेश) नियम-२०१२ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह. वर नमूद सेवा प्रवेश नियम सुधारणांसह www.policerecruitment2024.mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
5.2) वयोमर्यादा
| अ.क्र | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
|---|---|---|---|
| १. | खुला | १८ वर्षे | २५ वर्षे |
| २. | मागास प्रवर्ग (अ. माती, अ. जमाती, जि.भ.ज.-. भ.ज.-क, भ.ज. क.वि.मा.प्र., इ.मा.व., एस.ई.व्ही.सी., इ.डब्ल्यू.एस.) | १८ वर्षे | ३० वर्षे |
| ३. | प्रकल्पग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ४. | भूकंपग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ५. | माजी सैनिक उमेदवार | १८ वर्षे | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे |
| ६. | अंशकालीन पदवीधर उमेदवार | १८ वर्षे | ५५ वर्षे |
| ७. | अनाथ | १८ वर्षे | ३० वर्षे |
| अ.क्र | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा (खुला / मागास प्रवर्ग) |
|---|---|---|---|
| २. | खेळाडू उमेदवार | १८ वर्षे | २५ + ५ वर्षे / ३० + ५ वर्षे |
| ३. | पोलीस पाल्य | १८ वर्षे | २५ वर्षे / ३० वर्षे |
| ४. | गृहरक्षक | १८ वर्षे | २५ वर्षे / ३० वर्षे |
| ५. | माजी सैनिकावर अवलंबून असलेले (मुलगा) उमेदवार | १८ वर्षे | २५ + ३ वर्षे / ३० + ३ वर्षे |
6.4) शैक्षणीक अर्हताः
(i) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीअर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळा तर्फे घेण्यात येणार्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (१२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष बाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी-०३०५/ सीआर-२६६/पोल-५अ. दिनांक २९/०६/२००५ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
(ii) समकक्षबाबत
a) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार) (शासन निर्णय क्र. साप्रवि आरजीडी १५/११/प्र.क्र.८९/१३. दिनांक २०/५/२०११)
b) विद्यापीठे, मानीव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षमता (महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचेकडील क्र. समक १०९९/प्र.क्र.१३४/मशि-३, दिनांक १४/६/१९९९ व समक १०९९/१३४/मशि-६, दि.२८/२/२००७)
c) व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने ०२ वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमानी उच्च शिक्षणासाठी २ स्तराची समकक्षता निश्चित केलेले (महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचकडील क्र. व्हीओसी २०१२/५९१/प्र.क्र.२४५ (अ) / व्यशि-४, दिनांक २८/९/२०१२ व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. ओप्रशि२०१८/प्र.क्र.११०/एसडी-३. दिनांक २७/९/२०१८) ८) डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएससी २००५/ १४९)०५-उमाशि-२, दिनांक २०/६/२००१५ च्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण यांचेकडील पत्र क्र. एसएससी २०१०/६ (६६/१०)/उमाशि-२, दिनांक २९/४/२०१० व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
(iii) माजी सैनिक १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणार्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
(iv) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद - शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भारतीकरिता पात्र ठरतील.
6.5) शारीरिक पात्रता:
| पुरुष उमेदवारांकरिता |
|---|
| उंची १६८ से.मी. पेक्षा कमी नसावी |
| छाती न फुगता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. |
(ii) सूट -
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल - उंची: २.५ सें.मी.
b) टीप - महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील नियम ३ चा उपनियम २ चा उपखंड (अ) (२) नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
c) खेळाडू उमेदवारासाठी -आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहतील.
d) राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांबाबत - राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचार्याच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल.
- i) उंची: - २.५ सें.मी.
- ii) छाती- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.
6.6) अन्य अर्हताः
i) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र. एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/२०००/१२, दिनांक २८ मार्च, २००५ व शासन परिपत्रक एसआरव्ही-२०००/प्र.क्र.१७/२०००/१२. दिनांक १ जुलै, २००५ अन्वये विहित केल्यानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ अन्वये गट अ. ब. क आणि ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना (अ) आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे अनिवार्य आहे.
ii) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक - माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
iii) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-२०००/प्र. क्र.६१/२००१/३९ मंत्रालय मुंबई ३२, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार सदरील पदासाठी संगणक अर्हता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्याची सेवा समाप्त होईल.
iv) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) विभाग क्र. मार्तस २०१२/प्र.क्र. २७७/३९, दिनांक ४.२.२०१३ मध्ये नमुद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक ८६ प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र धारक असावा.
v) शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणी च्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
vi) नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शती) नियम १९८१ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रके व शुध्दीपत्रकांमधील तसेच, मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम, १९५१ व मुंबई राज्य राखीव पोलीस बल नियम, १९५९ मधील तरतुदी उमेदवारांस बंधन कारक राहतील.
vii) वित्त विभाग शासन निर्णय क्र. अनियो/१०/०५/१२६/सेवा-४ दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ नुसार दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी व त्यानंतर निवड होणार्या उमेदवारास नवीन परिभाषीत अंशदान निवृत्ति वेतन योजना (DCPS) लागू राहील. तथापि, त्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतन योजना [म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशिकरण) नियम १९८४] आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही. तसेच शासन, वित्त विभाग निर्णय क्र.अंनियो-२०१२/प्र.क्र.९६/सेवा-४ दिनांक २१ ऑगस्ट २०१४ नुसार नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तिवेतन योजना यापुढे राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (NPS)" या नावाने लागू होईल.
6.7) शारीरिक चाचणी -
i) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ य त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालील प्रमाणे १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल.
| क्र. | पुरुष उमेदवार | गुण |
|---|---|---|
| १ | ५ कि. मी. धावणे | ५० |
| २ | १०० मीटर धावणे | २५ |
| ३ | गोळाफेक | २५ |
| एकूण | १०० | |
6.8) लेखी चाचणी
- (i) शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील.
- (ii) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- (iii) लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात येईल.
-
(iv) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:
- a) अंकगणित
- b) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- c) बुद्धिमत्ता चाचणी
- d) मराठी व्याकरण
- (v) वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी / प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल (उदा. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस -१८१९/प्र.क्र ३१६/पोल-५ अ, दिनांक १०.१२.२०२० नुसार).
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments