Maharashtra Police Bharti Exam
- Home
- Course Details
पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्ड्समन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई या पदांकरिता सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतच्या सूचना-
विमुक्त जाती-अ भटक्या जमाती- ब, भटक्या जमाती-क, भटक्या जमाती-ड. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, एसईबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी मूळ कागदपत्र तपासणी वेळी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्या बाबतचे सक्षम प्राधिकरणाने दिलेले लगतच्या आर्थिक वर्षाचे म्हणजे ज्या वर्षी भरती असेल त्या आर्थिक वर्षाचे मुळ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Latest Non-Creamy Layer Certificate) सादर करावे. शासन शुध्दीपत्रक, इतर समाज बहुजन कल्याण विभाग क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र.७६/मावक, दिनांक ९ मार्च २०२३ अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गटात मोडत नसल्या बाबतची पडताळणी करण्यासाठी कालावधीत विचारात घेण्यात येईल. परंतु संवर्गाकरिता भरती ज्या वर्षी निघाली आहे त्या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटात मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
(ii) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक- बीसीसी २०११/प्र. क्र.२६४/२०११/१६-ब, दिनांक १२/१२/२०११ अन्वये ज्या उमेदवारांची निवड मागासप्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झालेली आहे. अशा उमेदवारांस त्यांच्या जात प्रमाणपत्र वैधता तपासणीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल. नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आतमध्ये आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक राहील.
(iii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक: राधाओ-४०१९/प्र. क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ अन्वये विहीत करण्यात आलेले मूळ प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणी च्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
8.2) समांतर आरक्षणा संदर्भात सर्वसाधारण तरतुदी-
(i) उमेदवार ज्या समांतर आरक्षणासाठी दावा करु इच्छितो, त्या समांतर आरक्षणाच्या दाव्याबाबत आवेदन अर्जामध्ये स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. आवेदन अर्ज सादर केल्यानंतर सुरू होणार्या भरती प्रक्रिये दरम्यान व त्यानंतरही उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा आरक्षणाबाबतचा अन्य दावा करता येणार नाही.
(ii) महिलांसाठी -
a) महिलांची आरक्षित पदे शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग, क्रमांक ८२/२००१/मसेआ-२००/प्र. क्र.४१५/का-२, दिनांक २५.५.२००१ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार भरण्यात येतील. महिला उमेदवार ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलांकरिता ३०% समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. तथापि, एखाद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरची पदे त्या प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येतील. महिला आरक्षणाचा लाभ घेणार्या महिला उमेदवारांनी आवेदन अर्जातील संबंधित रकान्यात महिला आरक्षणाचा लाभ घेत अवल्याबाबत स्पष्टपणे दावा केल्या नसल्यास याबाबत उमेदवारांना नंतर बदल करता येणार नाही.
b) शासन निर्णय, महिला व बाल विकास विभाग क्रमांक महिआ २०२३/प्र. क्र.१२३/प्र.क्र.१२३/कार्या-२. दिनांक ०४ मे २०२३ अन्वय अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवार्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यात बाबतच्या तरतुदी लागू राहतील.
c) महिलांसाठी आरक्षित असलेली पदे संबंधित वर्गवारीतील भरावयाच्या एकूण पदसंख्येपैको असतील.
(iii) खेळाडूंसाठी-
a) राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षणा संदर्भात महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक राक्रीधो-२००२/प्र. क्र. ६८/क्रीयुसे-२, दिनांक १.७.२०१६ व शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१७१७/प्र.क्र.३९/क्रीयुसे-२, दिनांक १७.३.२०१७ मधील विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र उमेदवारांमधून भरती करण्यात येईल. खेळाडूंसाठी ५% समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील शासन शुध्दीपत्रक क्रमांक राक्रीधो-२००२ /प्र.क्र. ६८ / क्रीयुसे-२, दिनांक ११.०३.२०१९ मधील अ.क्र. ४ नुसार दिनांक ०१.०७.२०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ६ मधील अनुक्रमांक (viii) मधील तरतुद सदर शुध्दीपत्रकान्वये रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर शुध्दीपत्रकातील अ.क्र. ३. (IX) नुसार क्रीडा अर्हतेनुसार संबंधित पदाच्या भरतीसाठी जाहिरात आल्यास अर्ज करताना खेळाडूने उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी करुन मिळण्याबाबत केलेल्या अर्जाची पोच पावती अथवा या पूर्वी खेळाडूस उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्राप्त झालेला प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जोडणे बंधन कारक आहे. अर्जा सोबत उपरोक्त तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांचा खेळाडू संवर्गातून विचार होणार नाही.
b) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक राक्रीधो-२००२/प्र. क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १.७-२०१६ मधील तरतुदींनुसार व तनंतर या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमानुसार विहित असलेल्या वय मर्यादेत ५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
c) शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, निर्णय क्रमांकः राक्रीधो-२००२/प्र. क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट २०१६ मधील तरतुदीनुसार खेळाडू आरक्षणाकरिता क्रिमीलेअरची अट लागू राहणार नाही. तसेच त्या त्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदल न करता त्या त्या प्रवर्गातील बिगर खेळाडू उमेदवारांमार्फत भरण्यात येईल.
d) उमेदवाराने त्यांची खेळविषयक सर्व प्रमाणपत्रे एकाचवेळी सादर करणे आवश्यक राहील. खेळाडु प्रवर्गातून सदर भरतीसाठी अर्ज करतांना दिनांक ०१.०७.२०१६ व दिनांक १०.१०.२०१७ च्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या स्पर्धा व खेळ पात्र असल्याबाबत / खेळाडू योग्यता प्रमाणपत्र बरोबर असल्याबाबत उमेदवाराने स्वतः खात्री करुनच अर्ज सादर करावा. कोणत्याही टप्प्यावर खेळाडूविषयक विहित पात्रता पूर्ण करत नसल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
(iv) प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त आरक्षणः
शासन निर्णय दिनांक २७ ऑगस्ट, २००९ अन्वये प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त ५% व भूकंपग्रस्त २% अन्वये समांतर आरक्षणाची सवलत देण्यात आली आहे. त्याचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्याबाबत जिल्हाधिकारी / जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, तसेच उक्त प्रमाणपत्रावर उमेदवाराचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या दिवशी सादर करणे आवश्यक आहे.
(v) माजी सैनिकांसाठीः
a) भूदल, नाविक दल व हवाईदल सेवेमध्ये सहा माहिने व त्यापेक्षा अधिक सेवा केली असेल याप्रमाणे संरक्षण सेवेमध्ये केलेली एकूण सेवा, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांक एमआरव्ही-१०९७/प्र. क्र.३१/९८/१६-अ, दिनांक १६.३.१९९९ मधील तरतुदींनुसार माजी सैनिकांसाठी १५% इतके समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे. युध्द काळात किंवा युध्दात नसतांना सैनिकी सेवेत मृत पावलेल्या किंवा अपंगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटूंबाच्या एका व्यक्तीस, शासन निर्णय, साप्रचि क्र. आरटीए १०८२/३५०२/सीआर-१००/१६-अ. दिनांक २/९/१९८३ व शासन आरटीए-१०८२/३५०२/सीआर-१००/१६-अ, दिनांक २२/४/१९८८ मधील तरतूदीनुसार शासकीय सेवेत भरतीकरिता प्राधान्य देय आहे. तसेच शासन परिपत्रक साप्रवि क्र. न्याया-२०१४/कोर्ट-९ (प्र.क्र.२४४/१४) २८, दिनांक ११/९/२०१४ नुसार माजी केंद्रीय हत्यारी पोलीस दल (Ex-CAPF) ह्या दलातील माजी सैनिकांच्या सोयी सुविधा लागू नाहीत.
अंशकालीन कर्मचारीः
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक पअंक-१००९/प्र.क्र.२००/२००९/१६-अ, दिनाक २७.१०.२००९ अन्वये सुशिक्षीत रोजगारांना अर्थसहाय्य या योजनेंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर / पदवीकाधारक अंशकालीन उमेदवारांना गट क पदामधील सरळसेवेच्या करावयाच्या नियुक्तीसाठी १०% समांतर आरक्षण ठेवण्यात आले होते. सदरहू आरक्षणापैकी ५% आरक्षण हे शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक लवेसु-३६१३/प्र.क्र.२३८/पोल-५अ, दिनांक २२.८.२०१४ अन्वये पोलीस पाल्यांसाठी वर्ग केले असल्याने पोलीस भरतीमध्ये पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी ५% आरक्षण देय आहे.
(vii) पोलीस पाल्यः
a) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक लवेसु-३६१३/प्र.क्र.२३८/पोल-५अ, दिनांक २२.८.२०१४ मधील तरतुदीं व शासन पत्र, गृह विभाग, क्रमांक पोलीस-१८१५/प्र.क्र.३०६/पोल-५अ, दिनांक १६.२.२०१६ मधील मार्गदर्शनानुसार पोलीस दलातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ३ टक्के पदे पोलीस भरतीत राखीव ठेवण्यात येत आहेत.
(viii) गृहरक्षक / होमगार्ड आरक्षणः
पोलीस शिपाई / बॅण्ड्समन / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई /कारागृह शिपाई पदांवर नियुक्ती करतांना एकूण पदांच्या ५% पदे ही होमगार्डमध्ये जाहिरातीच्या दिनांकास गृहरक्षक दलात कमीत कमी ३ वर्षे (१०९५ दिवस) एकत्रित सेवा झालेल्या व सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या, विहित वयोमर्यादेतील उमेदवारांसाठी समांतर आरक्षणांतर्गत राखीव आहेत. जाहिरातीच्या दिनांकास गृहरक्षक दलात ३ वर्षे (१०९५ दिवस) सेवा पूर्ण नसलेल्या उमेदवारास गृहरक्षक पदाचे आरक्षण लाभ देय होणार नाही. तसेच, जाहिरातीच्या दिनांकास गृहरक्षक दलात ३ वर्षे (१०९५ दिवस) एकत्रित सेवा पूर्ण केल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचा म्हणजेच समादेशक यांचा दाखला / प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
(ix) अनाथ व्यक्तींचे आरक्षणः
शासन निर्णय क्रमांक अनाथ २०२२/प्र. क्र.१२२का-०३, दिनांक ०६.०४.२०२३ मधील तरतुदीनुसार अनाथ मुलांसाठी असलेल्या राखीव पदासाठी अर्ज करतांना उमेदवाराकडे, महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र उमदेवाराने कागदपत्र छाननीचेवेळी पडताळणी समितीस उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. १% अनाथ आरक्षण प्रमाणपत्राच्या अनुषंगाने एखाद्या उमदेवाराची नोकरीमध्ये नियुक्ती झाल्यास त्याने तिने सादर केलेल्या अनाथ प्रमाणपत्राची तपासणी आयुक्त, महिला व बालविकास, पुणे यांच्यामार्फत करणे आवश्यक राहील.
(x) समांतर आरक्षणाबाबत :
शासन परिपत्रक, सामान्य, प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-१११८/प्र.क्र.३९/१६-अ, दिनांक १९ डिसेंबर २०१८ व १६/३/१९९९ आणि तद्नंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
(xi) शासकिय निमशासकीय कर्मचारी :
यांना वयोमर्यादेत कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. सदरील पद भरतीकरीता घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अर्ज करावयाचे असल्यास तो त्यांचे कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने विहित मार्गाने विहित मुदतीत अर्ज भरणे आवश्यक राहील. परवानगीची प्रत कागदपत्र छाननीच्या वेळी सादर करावी. अन्यथा त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
(xii) समान गुण व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य :
शासन, गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६/पोल-५ अ. दिनांक १०.१२.२०२० मधील तरतुदींनुसार लेखी परीक्षेमध्ये समान गुण मिळालेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करताना त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल. अर्ज करतेवेळी, संबंधित जिल्हास्तरीय समितीने कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य म्हणून पात्र ठरविल्याबाबतचा पुरावा साक्षांकित प्रतीसह उमेदवाराने कागदपत्र छाननीच्या वेळी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील.
(xiii) इतर अटी :
a) पोलीस शिपाई / बॅण्ड्समन / पोलीस शिपाई चालक / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्तीपुर्वी वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी करण्यात येईल. सदरहू दोन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारास संबंधित पदावर नियुक्ती देण्यात येईल. ज्या उमेदवाराचा चारित्र्य अहवाल आक्षेपार्ह असल्यास नियुक्ती दिली जाणार नाही व अशा प्रकरणी शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक पोलीस-१८१७/प्र.क्र.२११/पोल-५अ, दिनांक १९.७.२०१७ व पोलीस-१७१८/प्र.क्र २११/पोल-५ अ, दिनांक ३०.०९.२०२२ मधील तरतुदींनुसार कार्यवाही केली जाईल.
b) शैक्षणिक अर्हता व इतर अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे कागदपत्र / प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
c) महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम ३ (२) (ब) या नियमाच्या खंड (क) चा उपखंड (i) नुसार बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या बॅण्ड्समन उमेदवारांची प्रात्यक्षिक चाचणी (Musical Test) घेतली जाईल. सदर चाचणी अहर्ता चाचणी असेल. या प्रात्यक्षिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच, त्यांना लेखी व शारीरिक चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्तेनुसार बॅण्ड्समन पदासाठी निवड केली जाईल. सेवाप्रवेश नियमातील इतर अटी शर्ती बॅण्ड्समन पदावर निवड झालेल्या उमेदवारास लागू राहतील.
d) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक जेएलई-१०१५/१६६६/प्र. क्र.३०२/१५/तुरुंग-१, दिनांक ६.११.२०१५ नुसार कारागृह विभागातील कारागृह शिपाई (गट-क) ही पदे पोलीस विभागामार्फत भरण्यात येतात. सदरहू पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांसह लागू आहेत. इच्छूक उमेदवारांनी वर नमूद केल्याप्रमाणे आवेदन अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत.
(xiv) अधिवास प्रमाणपत्र :
a) उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे, तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक मकसी १००७/प्रक्र.३६/का.३६, दिनांक १०.०७.२००८ मधील तरतुदीनुसार ते सदर परिपत्रकात नमूद ८६५ गावातील १५ वर्षांचे वास्तव्य असल्याबाबतचा त्यांच्या वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील दाखला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहील. गडचिरोली जिल्ह्याकरिता उमेदवारास गडचिरोली जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
9) विशेष सूचना :
9.1) ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल तसेच उमेदवाराने मागितलेले सामाजिक समांतर आरक्षण अथवा वयोमर्यादा शिथील करणे इत्यादी मधील बदल / सवलती नामंजूर करण्यात येतील.
9.2) लेखी परीक्षेदरम्यान परीक्षा कक्षात किंवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
9.3) कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास / माहिती खोटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराला त्याचवेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र केले जाईल.
9.4) जाहिरातीतील नमूद केलेले सर्व शासन निर्णय / अधिसूचना / शासन परिपत्रके ही महाराष्ट्र शासनाच्या www.policerecruitment2024.mahait.org व www.mahapolice.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
10) महत्वाची टिप :
10.1) ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाच वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वतःचे नाव, शिक्का, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांनी स्वतः करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदर उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
10.2) उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
10.3) उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
10.4) उमेदवारांनी जाहीरात काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
10.5) उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
10.6) भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
10.7) भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित पोलीस घटक प्रमुखांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत उमेदवारास कोणताही दावा करता येणार नाही. त्याचप्रमाणे दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाकरिता पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल.
10.8) भरती प्रक्रियेसंबंधात वाद, तक्रारी उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित पोलीस घटक कार्यालयाच्या भरती प्रक्रियेत नेमणूक करण्यात आलेल्या अपिलीय अधिकारी यांना राहतील.
10.9) भरती प्रक्रिया सुरु असताना किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात व अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे / प्रमाणपत्र खोटी सादर केलेल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास अथवा निवड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार / गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यास तसेच विहित अर्हता / निकषांची पूर्तता करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची निवड / नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर तात्काळ रद्द करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
11) तात्पुरती निवड यादी व अंतिम निवड यादी :
(i) उमेदवारांना शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे कागदपत्र पडताळणीच्या अधिन राहून तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्य दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून तात्पुरती निवडयादी / प्रतीक्षायादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार तयार करुन प्रसिध्द करण्यात येईल. (उदा. गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६/पोल-५ अ, दिनांक १०/१२/२०२०)
तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांच्याच कागदपत्राची पडताळणी करण्यात येऊन, कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचाच अंतिम निवडसूची / प्रतीक्षासूचीमध्ये समावेश करण्यात येईल.
भरती प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी शेवटी करण्यात येणार असली तरी, उमेदवारांनी भरती प्रक्रियेत येतांना प्रवेशपत्रासोबत आवेदन अर्जाची प्रत, आवेदन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
भरती प्रक्रियेत मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत पोलीस घटक प्रमुखांकडून ज्या ज्या वेळी मागणी करण्यात येईल त्या त्या वेळी कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments