Maharashtra Police Bharti Exam
- Home
- Course Details
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्ड्समन / सशस्त्र पोलीस शिपाई / कारागृह शिपाई भरती प्रक्रिया
अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता आवश्यक माहिती www.policerecruitment2024 mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा फक्त www.policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षा शुल्क:
सदर परीक्षेकरीता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील.
| अ.क्र | पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
|---|---|---|---|
| १. | पोलीस शिपाई | रु. ४५०/- | रु. ३५०/- |
| २. | पोलीस शिपाई चालक | रु. ४५०/- | रु. ३५०/- |
| ३. | सशस्त्र पोलीस शिपाई | रु. ४५०/ | रु. ३५०/- |
| ४. | बॅण्ड्समन | रु. ४५०/- | रु. ३५०/- |
| ५. | कारागृह शिपाई | रु. ४५०/- | रु. ३५०/- |
2. आवश्यक कागदपत्रे:
- 2.1) SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
- 2.2) जन्म दाखला,
- 2.3) रहिवाशी प्रमाणपत्र)
- 2.4) जातीचे प्रमाणपत्र
- 2.5) जात-वैधता प्रमाणपत्र,
- 2.6) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
- 2.7) खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणी साठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे),
- 2.8) नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र: (वि.जा-अ, भ.ज- ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, ई. डब्लू. एस. प्रवर्गातील पुरूष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडींकरिता दावा करू इच्छित असणार्या महिला यांचे बाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि.०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र. ४ नुसार),
- 2.9) माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
- 2.10) गृह रक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल).
- 2.11) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
- 2.12) भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
- 2.13) पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
- 2.14) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,
- 2.15) अंशकालीन प्रमाणपत्र,
- 2.16) ई.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,
- 2.17) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.
- उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्या नंतर तपासण्यात येतील.
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments