Maharashtra Police Bharti Exam
- Home
- Course Details
पोलीस शिपाई बॅण्ड्समन:
सेवा प्रवेश नियम -
सेवाप्रवेश नियम सुधारणांसह www.policerecruitmcat2024.mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत
5.2) वयोमर्यादाः
i) मुख्य प्रवर्गानुसार
| अ.क्र. | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
|---|---|---|---|
| १. | खुला | १८ वर्षे | २८ वर्षे |
| २. | मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा.-अ, भ.ज.-ब, भ.ज.-क, भ.ज.-ड, वि.मा.प्र., इ.मा.व., एस.ई.बी.सी., इ.डब्ल्यू.एस.) | १८ वर्षे | ३३ वर्षे |
| ३. | प्रकल्पग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ४. | भूकंपग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ५. | माजी सैनिक उमेदवार | १८ वर्षे | उमेदवाराच्या सशस्त्र दलातील सेवाकाल अधिक ३ वर्षे इतकी |
| ६. | पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवार | १८ वर्षे | ५५ वर्षे |
| ७. | अनाथ | १८ वर्षे | ३३ वर्षे |
ii) समांतर आरक्षणांतर्गत
| अ.क्र. | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा (खुला वर्ग) | कमाल वयोमर्यादा (मागास प्रवर्ग) |
|---|---|---|---|---|
| १. | महिला उमेदवार | १८ वर्षे | २८ वर्षे | ३३ वर्षे |
| २. | खेळाडू उमेदवार | १८ वर्षे | २८ + ५ वर्षे | ३३ + ५ वर्षे |
| ३. | पोलीस पाल्य | १८ वर्षे | २८ वर्षे | ३३ वर्षे |
| ४. | गृहरक्षक | १८ वर्षे | २८ वर्षे | ३३ वर्षे |
| ५. | माजी सैनिकावर अवलंबून (मुलगा/मुलगी/पत्नी) | १८ वर्षे | २८ + ३ वर्षे | ३३ + ३ वर्षे |
5.3) शैक्षणिक अर्हताः
i) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधिनियम ४१) अन्वय प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
5.4) शारीरिक पात्रता :
| अ.क्र. | प्रवर्ग | उंची | छाती |
|---|---|---|---|
| १. | महिला उमेदवार | १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी | छातीची अट लागू नाही |
| २. | पुरुष उमेदवार | १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी |
न फुगवता : ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी
फुगवलेली व न फुगवलेली यामधील फरक किमान ५ से.मी. असावा
|
| ३. | तृतीय पंथी (ट्रान्सजेंडर) |
(अ) स्वत:ची लिंग ओळख महिला / तृतीय पंथी : १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी
(ब) स्वत:ची लिंग ओळख पुरुष : १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी
|
छातीची अट लागू नाही |
ii) सूट :
-
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार,
पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल :
- (i) उंची: ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
- (ii) छाती: छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
- b) टीप: महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम ३ चा उपखंड (क) नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
- c) खेळाडू उमेदवारासाठी – आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील.
-
d) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत – पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रमाणपत्रानुसार
ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचार्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास
पोलीस दलातील भरतीसाठी खालीलप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल :
- (i) उंची: २.५ सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी.
- (ii) छाती: २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून (पुरुष उमेदवारांसाठी).
-
e) बॅण्ड्समन पदाच्या उमेदवारासाठी –
- (i) उंची: २.५ सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
- (ii) छाती: २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.
- f) टीप: महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम ३ चा उपनियम २ चा खंड व चा उपखंड व मधील (i) व (ii) मध्ये विहित केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
5.5) अन्य अर्हता :
- (i) बॅण्ड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅण्ड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजवण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील.
- (ii) पोलीस बॅण्ड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीत शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बॅण्ड पथकातील अधिकार्यांचा समावेश करण्यात यावा.
- (iii) पोलीस बॅण्ड पथकासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयातील अन्य कर्तव्यही बजावणे आवश्यक राहिल.
- (iv) पोलीस बॅण्ड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार नाहीत. मात्र हे उमेदवार जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बॅण्ड पथकात बदलीस पात्र ठरतील.
5.6) शारीरिक चाचणी :
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-
5.6) शारीरिक चाचणी :
(i) पुरुष व महिला उमेदवार :
| पुरुष उमेदवार | गुण | महिला उमेदवार | गुण |
|---|---|---|---|
| (क) १६०० मीटर धावणे | २० | (क) ८०० मीटर धावणे | २० |
| (ख) १०० मीटर धावणे | १५ | (ख) १०० मीटर धावणे | १५ |
| (ग) गोळाफेक | १५ | (ग) गोळाफेक | १५ |
| एकूण | ५० | एकूण | ५० |
(ii) पुरुष / तृतीय पंथी उमेदवार :
| पुरुष / तृतीय पंथी उमेदवार | गुण | महिला तृतीय पंथी उमेदवार (स्वत:ची लिंग ओळख महिला) |
गुण |
|---|---|---|---|
| (क) १६०० मीटर धावणे | २० | (क) ८०० मीटर धावणे | २० |
| (ख) १०० मीटर धावणे | १५ | (ख) १०० मीटर धावणे | १५ |
| (ग) गोळाफेक | १५ | (ग) गोळाफेक | १५ |
| एकूण | ५० | एकूण | ५० |
5.7) लेखी चाचणी :
- (i) शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
- (ii) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- (iii) लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल.
- (iv) संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा.
-
(v) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल –
- a) अंकगणित
- b) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- c) बुध्दीमत्ता चाचणी
- d) मराठी व्याकरण
- (vi) वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी / प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध करण्यात येईल. (उदा. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/प्र.क्र.३१६/पोल-५ अ. दिनांक १०.१२.२०२० नुसार).
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments