महाराष्ट्र वन विभाग
वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
टिप: नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
- अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :-
वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील.
| क्र. | घटक | वयोमर्यादा | किमान | कमाल |
|---|---|---|---|---|
| १ | अमागास | १८ वर्षे | २७ वर्षे | |
| २ | मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ. | १८ वर्षे | ३२ वर्षे | |
| ३ | प्राविण्यप्राप्त खेळाडू (अमागास) | ३२ वर्षे | ||
| प्राविण्यप्राप्त खेळाडू (मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ.) | १८ वर्षे | ३२ वर्षे | ||
| ४ | माजी सैनिक (अमागास) | १८ वर्षे | २७ + सैनिकी सेवेचा कालावधी + ३ वर्षे | |
| माजी सैनिक (मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ.) | १८ वर्षे | ३२ + सैनिकी सेवेचा कालावधी + ३ वर्षे | ||
| ५ | प्रकल्पग्रस्त | १८ वर्षे | ४५ वर्षे | |
| ६ | भूकंपग्रस्त | १८ वर्षे | ४५ वर्षे | |
| ७ | पदवीधर अंशकालीन कर्मचारी | १८ वर्षे | ५५ वर्षे | |
| ८ | रोजंदारी मजूर | १८ वर्षे | ५५ वर्षे |
शारीरिक पात्रता
(अ) उमेदवाराने खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.
| शारीरिक माप | पुरुष | स्त्री |
|---|---|---|
| किमान उंची (से.मी.) | 163 | 150 |
| छातीचा घेर - न फुगवता (से.मी. मध्ये) | 79 | - |
| छातीचा घेर - फुगवून (से.मी. मध्ये) | 84 | - |
| वजन (कि.ग्र. मध्ये) | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी शिथिलक्षम:
| शारीरिक माप | पुरुष | स्त्री |
|---|---|---|
| किमान उंची (से.मी.) | 152.5 | 145 |
| छातीचा घेर - न फुगवता (से.मी. मध्ये) | 79 | - |
| छातीचा घेर - फुगवून (से.मी. मध्ये) | 84 | - |
| वजन (कि.ग्र. मध्ये) | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
(ब) उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.
| डोळा | दूर दृष्टी (सुधारलेली) | जवळील दृष्टी (सुधारलेली) |
|---|---|---|
| अधिक चांगला डोळा | 6/6 किंवा 6/9 | J.1 |
| वाईट डोळा | 6/12 किंवा 6/9 | J.11 |
प्रत्येक डोळा संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे.
शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञांकडून वैद्यकीय पात्रता प्रमाणित करण्यात येईल. वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रंग व रात आंधळेपणा, आतल्या बाजूला फेंगाडे असलेले गुडघे, सपाट पाय, त्वचा व छातीचे रोग या संबंधिचा आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) यांनी वेळोवेळी विहित केलेल्या अन्य वैद्यकीय चाचणीचा समावेश राहील.
शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्यात येईल.
नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचा-याचे मुलांना खाली नमूद केल्याप्रमाणे सूट देण्यात येईल.
- उंची: पुरुष व स्त्री उमेदवारासाठी २.५ से.मी.
- छाती: मोजणी आवश्यक नाही.
खेळाडू प्रवर्ग :- विहित शैक्षणिक अर्हता धारण करणा-या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणा-या खेळाडूंना, विहित उंचीमध्ये २.५ से.मी. इतकी सवलत देण्यात येईल.
वन कर्मचा-याचे पाल्यांना शारीरिक अर्हतेत सवलत सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावलेल्या वन कर्मचा-यांच्या एका मुलास किंवा मुलीस शारिरीक पात्रतेत खालील प्रमाणे सवलत देण्यात येईल.
- (ए) उंची: पुरुष आणि स्त्री उमेदवारास २.५ से.मी.
-
(बी) छाती: पुरुष उमेदवारांना
- न फुगवता – २.० से.मी.
- फुगवून – १.५ से.मी.
वेतन श्रेणी
| अ. क्र. | पदनाम | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| १ | वनरक्षक (गट- क) | S-७ : रु. २१७०० - ६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते |
परीक्षा शुल्क
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागेल
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| अमागास | रु. १०००/- |
| मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ | रु. ९००/- |
| माजी सैनिक | ० |
- माजी सैनिक यांना शासन निर्णय क्र. आरटीए-१०७९/०/४८२/४VI-A, दिनांक ३/७/१९८० नुसार परीक्षा शुल्कातून सूट देण्यात येत आहे.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
अर्ज करण्याची पध्दत
- उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅबमध्ये अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहीरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करूनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
- भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर उपलब्ध लिंकवर क्लिक केल्यानंतर Registration (नोंदणी) पृष्ठ सुरु होईल. यामध्ये उमेदवाराने परिपूर्ण माहिती भरावी. एस.एस.सी. रोल नंबर भरताना एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्याबाबत गुणपत्रिकेतील रोल नंबर नमूद करावा. Registration माहिती भरुन झाल्यानंतर बरोबर असल्याची खात्री करावी लागेल. Registration झाल्यानंतर बदल करता येणार नाही. Registration Number / Login Id व Password ई-मेल व एसएमएस द्वारे उपलब्ध होईल.
- तद्नंतर उमेदवाराने Post Selection या टॅबवर क्लिक करून "Click here to fill the application" वर क्लिक करावे. Personal Details पेज सुरु होईल. यामध्ये उमेदवाराने आपली माहिती भरावी. वनरक्षक हे वनवृत्त स्तरीय पद असून प्रादेशिक निवड समितीकडून भरती राबविण्यात येणार आहे. उमेदवाराने कोणत्याही एका वनवृत्ताची निवड करावी. निवडलेल्या वनवृत्ताचा दावा फक्त त्या वनवृत्ताकरीता मर्यादित राहील.
- अनुसूचित जमातीचा उमेदवार हा अनुसूचित क्षेत्रातील रहिवासी असेल तर संबंधित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या पदासाठी अर्ज करण्याची मुभा आहे. "स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार" याचा अर्थ जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत. जिल्ह्याची निवड करताना जात प्रमाणपत्रावरुन / जात वैधता प्रमाणपत्रावरुन माहिती निश्चित करावी.
- Additional Details, Communication Details, Qualification and Experience पेजवरील माहिती भरावी.
- Documents / Image Upload पेजवर Photograph upload करताना passport size आणि coloured with white background असलेली फोटो अपलोड करावी. Photo size 50kb ते 80kb, फॉर्मेट .jpg किंवा .jpeg, Scanner dpi 200, Dimension ३.५ cm * ४.५ cm असावी.
- Documents / Image Upload पेजवर Signature upload करताना size 50kb ते 80 kb असावा. फॉर्मेट .jpg किंवा .jpeg.
- Documents / Image Upload पेजवर इतर Documents upload करताना size 100 kb ते 300 kb असावा. फॉर्मेट .jpg, .jpeg किंवा pdf.
- पेमेंट फक्त ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
निवडीची पध्दत: ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ व शासनाच्या अनुषंगिक दिशानिर्देशानुसार निवड करण्यात येईल. निवडीबाबत टप्पे यासोबत परिशिष्ट-१२ म्हणून जोडले आहे.
ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
| अ.क्र. | विषय | गुण |
|---|---|---|
| १ | मराठी | ३० |
| २ | इंग्रजी | ३० |
| ३ | सामान्य ज्ञान | ३० |
| ४ | बौध्दिक चाचणी | ३० |
- 6.1.2 ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
- 6.1.3 परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- 6.1.4 परीक्षा ही २ तासाची राहील.
- 6.1.5 उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार वनरक्षक पदाकरीता पुढील टप्याकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
- 6.2 ऑनलाईन परीक्षेचा निकाल: वनवृत्तनिहाय ऑनलाईन परीक्षेचा निकाल वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवाराने ज्या वनवृत्तासाठी अर्ज केला आहे त्याच वनवृत्तासाठी त्याचा विचार करण्यात येईल.
कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी
- ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची तपासणी प्रादेशिक निवड समितीच्या मार्फत करण्यात येईल.
- वयोमर्यादा, आरक्षण प्रवर्ग इत्यादीबाबत उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील (सोबत जोडलेल्या परिशिष्ट-१३ प्रमाणे). आवश्यक कागदपत्रे सादर न करणारे किंवा गैरहजर राहणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
- वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता (उंची, छाती इत्यादी) धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घेण्यात येईल. आवश्यक शारीरिक पात्रता न धारण करणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
-
कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची पुढील चाचणी घेतली जाईल:
- पुरुष उमेदवार – ३० मिनिटात ५ कि.मी. धावणे
- महिला उमेदवार – २५ मिनिटात ३ कि.मी. धावणे
पुरुष उमेदवार ५ कि.मी. अंतर धावण्याची चाचणी (एकूण गुण: ८०)
| अ.क्र. | धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी (मिनिटांमध्ये) | अनुज्ञेय गुण |
|---|---|---|
| १ | १७ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ८० |
| २ | १७ मिनीट पेक्षा जास्त परंतु १८ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ७० |
| ३ | १८ मिनीट पेक्षा जास्त परंतु १९ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ६० |
| ४ | १९ मिनीट पेक्षा जास्त परंतु २० मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ५० |
| ५ | २० मिनीट पेक्षा जास्त परंतु २१ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ४५ |
| ६ | २१ मिनीट पेक्षा जास्त परंतु २२ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ४० |
| ७ | २२ मिनीट पेक्षा जास्त परंतु २३ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ३५ |
| ८ | २३ मिनीट पेक्षा जास्त परंतु २४ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ३० |
| ९ | २४ मिनीट पेक्षा जास्त परंतु २५ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | २५ |
| १० | २५ मिनीट पेक्षा जास्त परंतु २६ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | २० |
| ११ | २६ मिनीट पेक्षा जास्त परंतु २७ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | १५ |
| १२ | २७ मिनीट पेक्षा जास्त परंतु २८ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | १० |
| १३ | २८ मिनीट पेक्षा जास्त परंतु २९ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ५ |
| १४ | २९ मिनीट पेक्षा जास्त परंतु ३० मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ० |
टीप: ३० मिनीटांमध्ये ५ कि.मी. धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल.
महिला उमेदवार ३ कि.मी. अंतर धावण्याची चाचणी (एकूण गुण: ८०)
| अ.क्र. | धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी (मिनिटांमध्ये) | अनुज्ञेय गुण |
|---|---|---|
| १ | १२ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ८० |
| २ | १२ मिनीट पेक्षा जास्त परंतु १३ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ७० |
| ३ | १३ मिनीट पेक्षा जास्त परंतु १४ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ६० |
| ४ | १४ मिनीट पेक्षा जास्त परंतु १५ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ५० |
| ५ | १५ मिनीट पेक्षा जास्त परंतु १६ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ४५ |
| ६ | १६ मिनीट पेक्षा जास्त परंतु १७ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ४० |
| ७ | १७ मिनीट पेक्षा जास्त परंतु १८ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ३५ |
| ८ | १८ मिनीट पेक्षा जास्त परंतु १९ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ३० |
| ९ | १९ मिनीट पेक्षा जास्त परंतु २० मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | २५ |
| १० | २० मिनीट पेक्षा जास्त परंतु २१ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | २० |
| ११ | २१ मिनीट पेक्षा जास्त परंतु २२ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | १५ |
| १२ | २२ मिनीट पेक्षा जास्त परंतु २३ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | १० |
| १३ | २३ मिनीट पेक्षा जास्त परंतु २४ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ५ |
| १४ | २४ मिनीट पेक्षा जास्त परंतु २५ मिनीट किंवा त्यापेक्षा कमी | ० |
टीप: २५ मिनीटांमध्ये ३ कि.मी. धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल.
- वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचण्या शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येतील.
- कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचण्या यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवारांची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) / वनसंरक्षक (प्रादेशिक) तसेच अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती संकेतस्थळावर प्रसिध्द करतील. अपात्र उमेदवार या टप्यावरच भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
- सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे: ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व वरील ५ कि.मी. व ३ कि.मी. धाव चाचणीत प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून प्रादेशिक निवड समितीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी वनवृत्तवार तयार करुन ती संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.
-
निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करणे:
- ऑनलाईन परीक्षा व ५ कि.मी. व ३ कि.मी. धाव चाचणीत प्राप्त गुण यांची बेरीज करून तयार केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रादेशिक निवड समिती संबंधित वनवृत्तातील सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन रिक्त पदांच्या अनुषंगाने वनवृत्तवार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करेल.
- सदर यादी वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल.
- निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करताना महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. एफएसटी-०६/२२/प्र.क्र.१२८/फ-४, दिनांक २७/१२/२०२२ चे परिच्छेद १५ मधील प्रवर्गनिहाय रिक्त तरतूदीनुसार तयार करण्यात येईल.
| प्रवर्गनिहाय रिक्त पदांची संख्या | निवडसूचीमध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवारांची संख्या |
|---|---|
| १ | ३ |
| २ ते ४ | रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या १००% किंवा ५ यापैकी जे अधिक असेल ते |
| ५ ते ९ | रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या ५०% किंवा १० यापैकी जे अधिक असेल ते |
| १० ते ४९ | रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या ३०% किंवा १५ यापैकी जे अधिक असेल ते |
| ५० किंवा याहून अधिक | रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या २५% |
- (ब) वरीलप्रमाणे अतिरिक्त उमेदवारांच्या संख्येची परिगणना करताना उमेदवारांची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घेण्यात येईल.
- (क) वनरक्षक हे विभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक हे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. वनरक्षक पदासाठी ४ तासात पुरुष उमेदवारांना २५ कि.मी. व महिला उमेदवारांना १६ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी (stamina test) विहीत करण्यात आली आहे. सदर चाचणीद्वारे विहित केलेले अंतर उमेदवारांनी चालून, धावून किंवा चालून व धावून जास्तीत जास्त ४ तासात पूर्ण करणे अपेक्षित आहे. जे उमेदवार विहित वेळेत पूर्ण करू शकणार नाही, ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
6.6 निवड यादीची कालमर्यादा :
- 6.6.1 प्रादेशिक निवड समितीने तयार केलेली निवडसूची १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य राहील. त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल.
- 6.6.2 प्रादेशिक निवड समितीने तयार केलेल्या निवडसूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहीत मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार, जात प्रमाणपत्र / अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता / अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजिकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास, अशी पदे त्या त्या प्रवर्गाच्या निवडसूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून (प्रतिक्षायादीतील) वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील. मात्र, अशी कार्यवाही निवडसूचीच्या कालमर्यादेत करण्यात येईल.
7 पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतूदी
- 7.1 सदर जाहीरात प्रसिद्ध झाल्यानंतर पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर आरक्षण संबंधी शासन धोरणात बदल झाल्यास तो त्याप्रमाणे लागू राहील, याबाबत अद्ययावत सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येतील.
- 7.2 प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि, जाहीरात प्रसिध्द झाल्यानंतर मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची व विद्यमान पदसंख्येमध्ये बदल / वाढ होण्याची शक्यता आहे. या जाहीरातीमध्ये पदे आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही.
- 7.3 महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) असल्याबाबत नमूद करणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरिता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट शासन, महिला व बाल विकास विभाग निर्णय क्र. महिआ २०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दिनांक ४ मे २०२३ अन्वये रद्द केली आहे. तथापि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणा-या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.
- 7.4 वि.जा. (अ), भ.ज. (ब), भ.ज. (क) व भ.ज.(ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित वर्गवारीतील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रचलित शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
- 7.5 एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असेल तर संबंधित जात / जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
- 7.6 समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र. क्र.१६/१२/१६-अ, दिनांक १३ ऑगस्ट, २०१४ व शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग दिनांक १९ डिसेंबर २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- 7.7 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. राआधो-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- 7.8 शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२ / विजाभज-१, दिनांक २५ मार्च २०१३ अन्वये विहीत कार्यपध्दतीनुसार संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल.
- 7.9 शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी-२०१३/प्र.क्र.१८२ /विजाभज १, दिनांक १७ ऑगस्ट २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गट यामध्ये मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
- 7.10 सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरिता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. अराखीव (खुला) उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पूर्तता करणा-या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरिता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित /उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
- 7.11 कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणा-या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील उमेदवार तसेच महाराष्ट्र कर्नाटक विवादित सीमा भागातील उमेदवार केवळ "अराखीव-सर्वसाधारण" पदांवरील नेमणुकीसाठी पात्र असतील.
- 7.12 कोणत्या प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक व समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणा-या उमेदवाराकडे संबंधित कायदा / नियम / आदेशानुसार विहीत नमुन्यातील प्रस्तुत जाहीरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहीत केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
- 7.13 सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
7.14 खेळाडू आरक्षण
- 7.14.1 शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीघो-२००२/प्र. क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १ जुलै २०१६ तसेच शासन शुध्दीपत्रक क्रमांक राक्रीधो-२००२/प्र. क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १८ ऑगस्ट, २०१६, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण-१७१६/प्र.क्र.१८/क्रीयुसे-२, दिनांक ३० जून २०२२ आणि तदनंतर शासनाने वेळावेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
- 7.14.2 प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहीत अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
- 7.14.3 खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो, याविषयीच्या पडताळणीकरिता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणाकरिता पात्र समजण्यात येणार नाही.
- 7.14.4 एकापेक्षा जास्त खेळांचे प्राविण्य असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
- 7.15 दिव्यांग आरक्षण: - वनरक्षक हे पद शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्र. एफएसटी-०६/२१/प्र.क्र.१६५/फ-४, दि. २२/९/२०२१ अन्वये दिव्यांग पद निश्चितीमधून वगळली आहे.
-
7.16 अनाथ आरक्षण: -
- 7.16.1 अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, क्रमांक अनाथ-२०१८/प्र. क्र.१८२/का.०३, दिनांक २३ ऑगस्ट २०२१ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.
- 7.16.2 अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
7.17 माजी सैनिक आरक्षण:
- 7.17.1 उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. तसेच युद्धात / सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियास शासकीय सेवेत फक्त एका व्यक्तीला माजी सैनिकांना लागू असलेले १५% आरक्षण लागू राहील (सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक आरटीए-१०८२/३५०२/प्र.क्र.-१००/१६-अ, दिनांक २/९/१९८३)
- 7.17.2 माजी सैनिकांकरिता आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार असतील.
- 7.18 प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षण: शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक एईएम-१०८०/३५/१६-अ, दिनांक २० जानेवारी १९८० तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळावेळी नमूद करण्यात येणा-या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील.
- 7.19 भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण: शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक भूकंप-१००९/प्र. क्र.२०७/२००९/१६-अ, दिनांक २७ ऑगस्ट २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण राहील.
- 7.20 पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण: शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक पअंक-१००९/प्र. क्र.२००/२००९/१६-अ, दिनांक २७ ऑक्टोबर २००९ तसेच यासंदर्भात शासनाकडून वेळावेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण राहील.
- 7.21 रोजंदारी मजूर: शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्रमांक वनम-२०१३/प्र. क्र.३३४/फ-९, दिनांक १६/१०/२०१२ अन्वये वनविभागातील रोजंदारी मजुरांना १०% आरक्षण लागू राहील. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या रोजंदारी मजुराने त्यांच्या सेवेबाबत, मूळ कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळेस त्यांना संबंधित वन विभागातील उप वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- 7.22 होमगार्ड: शासन, महसूल व वनविभाग, निर्णय क्र. एफएसटी-०५/०८/प्र.क.३४५/फ-४, दिनांक २ सप्टेंबर २००८ अन्वये होमगार्डमध्ये कमीत कमी ३ वर्ष इतकी सेवा झालेल्या व वनरक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक / शारिरीक पात्रता पूर्ण करणा-या व विहित वयोमर्यादेतील तसेच विहित पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणा-या होमगार्ड करीता ५% पदे राखीव केलेली आहेत.
- 7.23 मा. राज्यपाल यांचेकडील अधिसूचना क्र. आरबी/टीसी/इ-१३०१६ (१) (२०१२)/अनुसूचित क्षेत्रातील भरती/१५६, दिनांक २९/८/२०२३ जी पदे स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांकरीता राखीव केली आहे ती पदे स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधूनच भरावयाची आहेत. स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा आई-वडील किंवा आजी-आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत, असा आहे. उमेदवाराच्या मुळ ठिकाणाची माहिती ही सदर उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरुन / जात वैधता प्रमाणपत्रावरुन घेणेबाबत शासन, महसूल व वनविभाग पत्र क्र. एफएसटी-०७/१४/प्र.क्र.४४६/फ-४, दिनांक १६ एप्रिल २०१५ अन्वये स्पष्ट केले आहे.
- 7.24 आरक्षित पदांकरिता उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र शासन निर्णय बीसीसी-२०११/प्र. क्र.१०६४/२०११/१६-ब दिनांक १२.१२.२०११ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील.
9. सेवाप्रवेशोत्तर शर्ती:
- 9.1 वनरक्षक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराने वनविभागाच्या कोणत्याही राज्य वनरक्षक प्रशिक्षण विद्यालयातून ६ महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. तत्पुर्वी उमेदवारांना रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्रक (Bond) द्यावे लागेल.
- 9.2 हिंदी आणि मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जर ती व्यक्ती अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाली नसेल किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर ती परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
- 9.3 महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
- 9.4 वनरक्षक पदावर नियुक्त झालेली व्यक्ती संबंधित वनवृत्तात कोठेही बदलीस पात्र राहील.
- 9.5 महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रके व शुध्दीपत्रकामधील तरतुदी उमेदवारांस बंधनकारक राहतील.
- 9.6 शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक अनियो/१०/०५/१२६/सेवा-४, दिनांक ३१/१०/२००५ नुसार दिनांक १/११/२००५ रोजी व त्यानंतर निवड होणा-या उमेदवारांचा नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (सध्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना) लागू राहील.
- 9.7 विशेष व्याघ्र संरक्षण दल (STF) दिल्यानंतर संबंधित वनरक्षकांना या कार्यालयाचे स्थायी आदेश दिनांक १८/१०/२०१९ मधील तरतूदीनुसार STF मध्ये किमान २ पदावधी पूर्ण करणे क्रमप्राप्त राहील.
10. इतर महत्वाच्या सूचना
- 10.1 निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किंवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.
- 10.2 उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीच्या संबंधात कोणत्याही प्रकारचा वशिला किंवा दबाव आणण्याचा किंवा गैरप्रकारचा अवलंब केल्यास त्याची उमेदवारी अपात्र ठरवली जाईल.
- 10.3 भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणी अंतर्गत अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत वेळेवर बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादीस मान्यता देणे, जाहीरातीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणे या बाबतचे संपूर्ण अधिकार प्रादेशिक निवड समितीला आहेत.
- 10.4 उमेदवारांना परीक्षेकरिता, कागदपत्रे पडताळणी करिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.
- 10.5 भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवार कोणत्याही कारणास्तव गैरहजर असेल तर असे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील व परीक्षा शुल्क नापरतावा राहील.
- 10.6 उमेदवाराने ज्या वनवृत्तात भरतीकरिता ऑनलाइन द्वारे आवेदन सादर केले आहे, केवळ त्याच वनवृत्ताकरिता उमेदवाराचा दावा राहील. इतर वनवृत्तासाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
- 10.7 मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
- 10.8 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) व ई-मेल आयडी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नये.
- 10.9 ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहीरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहीरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी.
- 10.10 चुकीची/खोटी प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- 10.11 शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये अर्ज करावयाचे असल्यास त्यांना त्यांच्या कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने विहीत मार्गाने व विहीत मुदतीत भरणे आवश्यक राहील.
परिशिष्ठ-१२ निवड प्रक्रियेचे टप्पे
| अ.क्र. | टप्पे |
|---|---|
| १ | ऑनलाईन अर्ज स्वीकारणे |
| २ | प्रवेश पत्र / हॉल तिकीट निर्गमित करणे |
| ३ | ऑनलाईन परीक्षा |
| ४ | ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने आदर्श उत्तरपत्रिका वेबसाईटवर प्रसिध्द करणे |
| ५ | आदर्श उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने चुकीच्या छाप प्रश्नाविरूध्द आक्षेप (असल्यास) प्राप्त करणे |
| ६ | ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे |
| ७ | कागदपत्रे तपासणे, शारीरिक मोजमाप घेणे व ५ कि.मी./३ कि.मी. धाव चाचणी करिता शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे कडून प्रमाणपत्र प्राप्त करून चाचणी घेणे |
| ८ | सर्वसाधारण गुणवत्ता यादी वेबसाईटवर जाहिर करणे |
| ९ | ऑनलाईन परीक्षेतील व धाव चाचणीतील गुण मिळून निवड यादी व प्रतिक्षा यादी वेबसाईटवर जाहिर करणे |
| १० | २५/१६ कि.मी. (पुरुष/महिला) चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी |
लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र
लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्रClick on the icon to download Pratinyapatra
वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे वचनपत्र
वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे वचनपत्रवनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीच्या द्यावयाचे वचनपत्रClick on the icon to download Hamiptra
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments