कारागृह शिपाई
सेवा प्रवेश नियम
(i) शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक जेएनई-१०१५/१६६६/प्र.क्र.३०२/१५/तुरंग-१. दिनांक ६.११.२०१५ नुसार कारागृह विभागातील कारागृह शिपाई (गट-क) ही पदे पोलीस विभागा मार्फत भरण्यात येतात. सदरहू पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांसह.
(ii) वर नमूद सेवाप्रवेश नियम सुधारणांसह www.policerecruitment2024.mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
7.2) वयोमर्यादा:
| अ.क्र. | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
|---|---|---|---|
| १. | खुला | १८ वर्षे | २८ वर्षे |
| २. | मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा.-अ, भ.ज.-ब, भ.ज.-क, भ.ज.-ड, वि.मा.प्र., इ.मा.व., एस.ई.बी.सी., इ.डब्ल्यू.एस.) | १८ वर्षे | ३३ वर्षे |
| ३. | प्रकल्पग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ४. | भूकंपग्रस्त उमेदवार | १८ वर्षे | ४५ वर्षे |
| ५. | माजी सैनिक उमेदवार | १८ वर्षे | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी + ३ वर्षे |
| ६. | पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवार | १८ वर्षे | ५५ वर्षे |
| ७. | अनाथ | १८ वर्षे | ३३ वर्षे |
समांतर आरक्षणांतर्गत उमेदवार
| अ.क्र. | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
|---|---|---|---|
| १. | महिला उमेदवार | १८ वर्षे | २८-३३ वर्षे |
| २. | खेळाडू उमेदवार | १८ वर्षे | ३३-३८ वर्षे (२८+५ ते ३३+५) |
| ३. | पोलीस पाल्य | १८ वर्षे | २८-३३ वर्षे |
| ४. | गृहरक्षक | १८ वर्षे | २८-३३ वर्षे |
| ५. | माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार (मुलगा, मुलगी, पत्नी) | १८ वर्षे | ३१-३६ वर्षे (२८+३ ते ३३+३) |
7.3) शैक्षणीक अर्हता -
(i) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महा. अधिनियम ४१) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीअर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळा तर्फे घेण्यात येणार्या १२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत) (१२ वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष बाबतचे गृह विभाग शासन पत्र क्र. आरसीटी-०३०५/सीआर-२६६/पोल-५अ. दिनांक २९/०६/२००५ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
(ii) समकक्षबाबत -
a) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला या यशवंतराव मुक्त विद्यापिठातून पदवी धारण केलेला उमेदवार) (शासन निर्णय क्र. साप्रवि आरजोडी १५/११/प्र.क्र.८९/१३, दिनांक २०/५/२०११)
b) विद्यापीठे, मानीव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका समकक्षमता (महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचेकडील क्र. समक १०९९/प्र.अ.१३४/मशि-३० दिनांक १४/६/१९९९ व समक १०९९/१३४/मशि-६. दि.२८/२/२००७)
c) व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने ०२ वर्षे कालावधीच्या अभ्यास क्रमांना उच्च शिक्षणासाठी २ स्तराची समकक्षता निश्चित केलेले (महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे कडील क्र. व्हीओसी २०१२/५९१/प्र.क्र.२४५ (अ) व्यशि-४, दिनांक २८/९/२०१२ व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. ओप्रशि २०१८/प्र.क्र.११०/एसडी-३, दिनांक २७/९/२०१८)
d) डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग (महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएससी २००५ (१४९३०५-उमाशि-२, दिनांक २०/६/२००५ च्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण यांचेकडील पत्र क्र. एसएससी २०१०/६ (६६/१०) / उमाशि-२, दिनांक २९/४/२०१० व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार).
(iii) माजी सैनिक :
१५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणा-यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता १० वी उत्तीर्ण किया IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
(iv) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद
शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरती करिता पात्र ठरतील.
7.4) शारीरिक पात्रता
| प्रवर्ग | उंची | छाती |
|---|---|---|
| महिला उमेदवार | १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी | - |
| पुरुष उमेदवार | १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी | न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा. |
| तृतीय पंथी (ट्रान्सजेंडर) |
(अ) स्वत:ची लिंग ओळख महिला / तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी: १५५ से.मी. पेक्षा कमी नसावी (ब) स्वत:ची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी: १६५ से.मी. पेक्षा कमी नसावी |
स्वतःची लिंग ओळख महिला / पुरुष / तृतीय पंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही |
ii) सूटः
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल-
- उंची: ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
- छाती: छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
b) टीप- महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम ३ चा उपखंड (क) नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
c) खेळाडू उमेदवारासाठी- आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणार्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील.
d) पोलीस दलातील कर्मचार्यांच्या कुटुंबियांबाबत- पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल.
- उंची: - २.५ सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी.
- छातीः- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी.
7.5) शारीरिक चाचणी-
कारागृह शिपाई यांची भरती ही महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवा प्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदीनुसार होत असल्याने कारागृह शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालील प्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-
पुरुष / तृतीय पंथी उमेदवार - शारीरिक चाचणी गुण
| अ.क्र. | परीक्षण | गुण |
|---|---|---|
| १. | १६०० मीटर धावणे | २० |
| २. | १०० मीटर धावणे | १५ |
| ३. | गोळाफेक | १५ |
| एकूण | ५० | |
महिला / तृतीय पंथी (महिला ओळख) - शारीरिक चाचणी गुण
| अ.क्र. | परीक्षण | गुण |
|---|---|---|
| १. | ८०० मीटर धावणे | २० |
| २. | १०० मीटर धावणे | १५ |
| ३. | गोळाफेक | १५ |
| एकूण | ५० | |
लेखी चाचणीः
- (i) शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील.
- (ii) उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- (iii) लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित केला जाईल.
- (iv) संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सदर बाब विचारात घेऊन अर्ज पूर्ण करावा.
-
(v) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:
- a) अंकगणित
- b) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- c) बुद्धिमत्ता चाचणी
- d) मराठी व्याकरण
7.7) वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी / प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित आदेशानुसार तयार करून प्रसिद्ध केली जाईल (उदा. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/प्र.क ३१६/पोल-५ अ, दिनांक १०.१२.२०२० नुसार).
Course Programs
- Lectures
- Quizzes
- Duration
- Students
- Assessments